Pune Sevasadan Society

शताब्दी स्मरणिका प्रकाशन सोलापूर

पुणे सेवासदन संस्था, सोलापूर शाखेतर्फे देण्यात येणारा रमाबाई रानडे पुरस्कार डॉ. श्रीमती सुहासिनी शहा (प्रिसिजन फाउंडेशन अध्यक्ष)  यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा परांजपे यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच सोलापूर शाखेच्या वेबसाईटचे उदघाटन डॉ. श्रीमती सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर शाखेनी नुकताच शताब्दी महोत्सव साजरा केला. सदर शताब्दी महोत्सवाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवर कार्यकारी मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.