Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

आर. आर. प्रौढ हायस्कूल

न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या पत्नी कै. सौ. रमाबाई रानडे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व आणि निकास लक्षात घेत सन १९०९ साली पुणे सेवासदन संस्थेची स्थापना त्यांच्या निवासस्थानी केली.

 

प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणासाठी सेवासदन संस्थेने पुढाकार घेतला आणि सन १९७२ मध्ये श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल या शाळेची पुण्यात स्थापना केली. वय वर्ष १४ ते ५० वयोगटातील मुली आणि महिला या शाळेत शिक्षण घेतात. वेगवेगळ्या कारणांमुळे मुलींना तसेच महिलांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते. अश्या मुलींना व महिलांना पुन्हा शिक्षण घेण्याची संधी या शाळेमुळे प्राप्त होते.

 

शाळेत शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थिनी अर्धवेळ नोकरी किंवा वेगवेगळी कामे जरी करीत असल्या तरी त्यांची शिक्षण घेण्याची तीव्र इच्छाच त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करत असते.

 

आमच्या विद्यार्थिनींमध्ये मुख्यत: प्रौढ महिला, अनाथ मुली, घटस्प्फोटीत स्त्रिया आणि मागासवर्गीय मुलींचा समावेश आहे.

वर्गसंरचना

प्रशालेत शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या एकत्रित प्रयत्नाने या विद्यार्थिनींना आम्ही सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो.