Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल


न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी श्रीमती रमाबाई रानडे यांनी १९०९ साली सेवासदन संस्थेची स्थापना केली. त्यांना या कार्यात श्री गोपाळ कृष्ण देवधर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

शाळेबद्दल

महिलांच्या सबलीकरणासाठी व त्यांच्या सामाजिक उद्धारासाठी सेवासदन संस्थेने फार मोलाचे कार्य केले आहे.संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा एरंडवणे येथील सुसज्ज इमारतीमध्ये आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा १९९७ साली सुरु करण्यात आली. सुरवातीच्या काळात फक्त मुलींनाच या शाळेत प्रवेश दिला जात असे पण काही वर्षातच पालकांच्या मागणी नुसार संस्थेने आपल्या घटनेत बदल केला व मुलांना देखील शाळेत प्रवेश देण्यास सुरवात केली. सध्या नर्सरी पासून दहावी पर्यंत शाळेचे कामकाज चालते. २०१७ साली शाळेला CBSE बोर्डाची संलग्नता मिळाली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या मनात नम्रता, कष्ट करण्याची क्षमता, सचोटी, चिकाटी आणि भोवतालच्या निसर्गाबद्दल आवड निर्माण करणे, देशप्रेम, सर्व धर्मांचा आदर करणे आणि आपले देशाप्रती असलेले कर्तव्य या भावना वाढीस लागाव्या म्हणून प्रयत्न केले जातात.

 

पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. प्रशिक्षित व सर्जनशील शिक्षकांच्या सहाय्याने शिक्षण हा एक आनंददायक अनुभव व्हावा असा प्रयत्न असतो. मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान संस्थेने उपलब्ध केले आहे. गायन, वादन व कला गुणांचा विकासावर विशेष भर दिला जातो. मुलांना विविध ठिकाणी सहलीसाठी नेले जाते. तसेच दृकश्राव्य माध्यमातून त्याना विविध विषयांची ओळख करून दिली जाते.

 

शालेय  अभ्यास क्रमा बरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी रोलर स्केटिंग, तायक्वांदो, जिम्नॅस्टिक्स, भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन व वादन, नाटक,  संस्कृत भाषा इत्यादींच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो. शाळेत सुसज्ज अशी संगणक खोली, प्रयोगशाळा व ग्रंथालय आहे. 

एकूण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी केजी ते दहावी पर्यंत

१९९७ मध्ये स्थापन झाल्यापासून  अल्प कालावधीत ही शाळा एक ब्रँड नेम बनली आहे. शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्न आहे.

एकूण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी केजी ते दहावी पर्यंत

१९९७ मध्ये स्थापन झाल्यापासून  अल्प कालावधीत ही शाळा एक ब्रँड नेम बनली आहे. शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्न आहे.