Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

दिलासा कार्यशाळा - स्थापना वर्ष १९८४

संस्थांची उद्दिष्ट

• बौद्धीकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन .
• स्वत:ची ओळख (कामातुन आणी सरावातुन)
• प्रौढ दिव्यांग व्यक्तींचे एकात्मिक विकास करणे.
• सामाजिक उद्बोधनपर कार्यक्रम.

विद्यार्थी संख्या

निदेशकाची संख्या

उपक्रम

• साधारण कार्यशाळेत सकाळच्या वेळेत दिव्यांग व्यक्ती विवीध विभागातुन व्यावसायिक प्रशिक्षण घेत असतात.
• दुपारच्या सेशनमध्ये विवीध बैठे खेळ.
• तसेच योगा,सत्त्संग आणि प्राणायाम नृत्य, असे विवीध कृतीशील उपक्रमामध्ये भाग घेतात.

सांस्कृतिक कार्यक्रम

सेवासदन दिलासा कार्यशाळा ही प्रौढ दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य  करते. दरवर्षी कार्यशाळेमध्ये डिसेंबर  महिन्यामध्ये “ जागतिक  दिव्यांग दिन” (३ डिसेंबर) व  राष्ट्रीय मानसिक दिव्यांग दिन (८ डिसेंबर) असा पूर्ण आठवडा भरगच्च कार्यक्रम असतो

मनोरंजनात्मक कार्यक्रम
विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन
बक्षीस वितरण समारंभ

शिवाय पूर्ण वर्षामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

गुरुपौर्णिमा,
गणपती प्रतिष्ठापना
श्रावणी शुक्रवार
रक्षाबंधन
दहिहंडी
भोंडला
खंडेनवमी
दिवाळी
चैत्र हळदी कुंकू.

कार्य शाळेतील व्यावसायिक प्रशिक्षण

*  पेपर द्रोण बनविणे

*  विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविणे

*  बेकिंग पदार्थ

*  पेपर श्रेडिंग

*  भाजीपाला पिकवणे

अश्या विविध माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. स्वतंत्रपणे विचार करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय   ते पॅकिंग,वजन करणे, लेबलिंग इ. करायला शिकतात. धान्य भाजणे/छोटी-छोटी मशीनस वापरायला शिकतात.