Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

संस्थेविषयी

Our founders pioneered the movement for women’s empowerment at the turn of the 20th century. Today, over 100 years later, we are proud to continue to build on their legacy and steer Seva Sadan towards the welfare of marginalised girls. We offer them holistic upbringing and a secure childhood, equip them with education and life-skills relevant to our times, and give them hope for a brighter future. 

गुड्डी अडवाणी ,अध्यक्ष, सेवासदन संस्था

Image 14

भारतात महिलांच्या शिक्षणासाठी व सबलीकरणासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये श्रीमती रमाबाई रानडे ( १८६२ – १९२४ ) यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. २५ जानेवारी १८६२ या दिवशी कुर्लेकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी १८७३ साली वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांचा विवाह संपन्न झाला व त्यांचे आयुष्य बदलून गेले. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः समाजसुधारक असल्याने विवाहा नंतर त्यांनी रमाबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी रमाबाई यांना मराठी व इतर भाषा शिकवल्या. .  

रमाबाईंनी मुंबई मध्ये ‘हिंदू लेडीज क्लब’ स्थापन केला. न्यायमूर्ती रानडे यांचे १९०१ साली आकस्मित निधन झाल्यावर रमाबाई पुणे येथे राहण्यास आल्या व १९०९ साली त्यांनी सेवासदन संस्थेची महिलांच्या सबलीकरणासाठी स्थापना केली. या कामामध्ये त्यांना कैलासवासी गोपाळ कृष्ण देवधर यांचे बहुमोल सहाय्य लाभले. ते सेवासदन संस्थेचे पहिले ‘मानद सचिव’ होते. रमाबाई यांच्या प्रयत्नामुळे हजारो महिला साक्षर, स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनल्या.

महिलांना शिक्षित केले तर त्यांचे समाजातील स्थान बळकट होईल असे रमाबाईंचे मत असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न करताना त्यांनी महिलांना नर्सींगचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. त्यावेळच्या समाजातील कर्मठ विचारांच्या विरोधात जाऊन त्यांनी मुलींना व विधवा स्त्रियांना नर्सिगचे प्रशिक्षण दिले. 

त्यावेळची सामाजिक परिस्थिती महिलांच्या शिक्षणाला पूरक नव्हती तरीही रमाबाई यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे सेवासदन संस्थेची भरभराट झाली. ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात रमाबाईंनी महिलांच्या अधिकाराच्या बाबतीत व शिक्षणाच्या बाबतीत विरोधी सूर असलेल्या त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन केले आहे.

सेवासदन संस्था स्थापन केल्यावर सुरवातीच्या काळात फक्त विधवा व परित्यक्ता स्त्रियांना प्रवेश दिला जात असे. तथापि बदलत्या कालानुसार सेवासदन संस्थेने केलेल्या बदलानुसार माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, प्रौढ महिलांच्यासाठी शाळा, इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा, अध्यापिका विद्यालय, मुलींचे वसतिगृह, दिव्यांग मुलांसाठी शाळा व कार्यशाळा, इत्यादी अनेक शाखा सुरु केल्या आहेत.

:: भविष्यातील उपक्रम ::

सेवासदन संस्थेतर्फे महिलांच्यासाठी अद्ययावत असे वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. तसेच महिलांना परकीय भाषा, व्यावसायिक अभ्यासक्रम व तांत्रिक प्रशिक्षण देणारे कोर्सेस सुरु करण्याचा मनोदय आहे.