समिती सदस्य
![6452d4bb-c33a-4c48-a440-a1e8f9732bf1 6452d4bb-c33a-4c48-a440-a1e8f9732bf1](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/6452d4bb-c33a-4c48-a440-a1e8f9732bf1-pxue8wfiax7bhljkj4eflrrkdw97xlb5381lugltfk.png)
अध्यक्ष
सौ. वर्षा श्रीकांत परांजपे
शिक्षण:
BSc in food and nutrition. (SNDT college Juhu, Mumbai)
Diploma in cookery. (Food craft institute, Pune )
कामाचा अनुभव:
व्हीनाईल एसिटेटची निर्मिती करणारे युनिट सुरु केले.
Paranjape Schemes ( Construction ) Limited येथे डायरेक्टर पदावर काम केले.
कंपनीच्या कारभाराचा विस्तार पुणे, मुंबई व इतर शहरात केला.
Shopping Glory नावाने पुणे शहरात सहा दुकानातून खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय यशस्वीपणे केला.
वयाच्या चाळीशी नंतर व्यवसायातून निवृत्ती घेऊन सामाजिक कामाला सुरवात केली.
बहुविकलांग मुलांसाठी कार्य करणा-या Space या संस्थेची स्थापना केली.
विले पार्ले मुंबई येथील रमाबाई रानडे बालक मंदिर या शाळेच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून १५ हून अधिक वर्षे कार्यरत.
MVM School येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.
![6fecb823-a3ef-4790-a36c-0da69f61b14a 6fecb823-a3ef-4790-a36c-0da69f61b14a](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/6fecb823-a3ef-4790-a36c-0da69f61b14a-pxue9cerj3t6yywcxtb3a5qehg2gkg2ktf4v05y4hs.png)
उपाध्यक्ष
नितीन मधुसूदन लेले
पुणे येथील COEP मधून १९८२ मध्ये अभियंता म्हणून पदवी संपादन केली.
गेली ३९ वर्ष Registered Valuer म्हणून कार्यरत.
Institution of Valuers या संस्थेचा कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत.
बगदाद, इराक येथे व्यावसायिक कारकिर्दीला सुरवात केली.
२००३ पर्यंत पुण्यात बांधकाम व्यावसायिक म्हणून अनेक इमारतींचे बांधकाम.
Valuation या विषयावर लिहिलेल्या लेखाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
बँक, इंडस्ट्री, संस्था यांच्यासाठी valuer म्हणून कार्यरत.
ज्योतिष विशारद पदवी संपादन केली.
Graphology या विषयाचा छंद म्हणून सखोल अभ्यास.
![Ashwini Ganu Ashwini Ganu](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/Ashwini-Ganu-py2pdq2gwews1r86606xsanwsu3hlsshny739lkbi8.jpeg)
ई सी सदस्य
श्रीमती अश्विनी गानू
शिक्षण:
अश्विनी गानू यांनी समाजशास्त्र या विषयात पदवी संपादन केली आहे.
तसेच त्यांनी Communication for Children, Optometry आणि Ocularisty या विषयातील डिप्लोमा पूर्ण केला आहे.
कामाचा अनुभव:
• Innovative Technomics Pvt. Ltd. या कंपनीच्या संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे.
• New Modern Opticians या नावाने कित्येक वर्षे त्या व्यवसाय करतात.
• Pune Optometrist Association च्या पहिल्या प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
• All India Optometrist Association च्या कोषाधिकारी म्हणून त्यांनी १० वर्षे काम केले.
पुणे शहरातील अनेक संस्थांशी श्रीमती अश्विनी गानू निगडीत आहेत.
![f2c6a707-2473-4749-9683-1da37e898745 f2c6a707-2473-4749-9683-1da37e898745](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/f2c6a707-2473-4749-9683-1da37e898745-pxue9v7jbsixf651w1fmo0zmd5hsue57k06klp691c.png)
ई सी सदस्य
श्री. लिमये विजय श्रीराम
शिक्षण:
एडव्होकेट श्री विजय लिमये यांनी Indian Law Society च्या ILS Law College मधून १९९२ साली कायदे विषयातील पदवी मिळविली
कामाचा अनुभव:
• गेली अनेक वर्षे श्री लिमये जिल्हा न्यायालयात व विविध Tribunal च्या माध्यमातून वकिल म्हणून काम करत आहेत.
•अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या व अनेक शैक्षणिक संस्थांचे सल्लागार म्हणून ते गेली कित्येक वर्षे काम पाहतात.
Rotary International चे श्री लिमये अनेक वर्षे सक्रीय सभासद आहेत.
पुणे सेवासदन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून श्री लिमये २०१५ पासून कार्यरत आहेत. संस्थेच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
![rajiv rajiv](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/rajiv-pygl6ryhum1jn3bbdln9ht8hm0mqcbynhahbnv33nk.png)
ई सी सदस्य
Add your popup content here
![smita smita](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/smita-py63jb1t3svbdphqdduln2xnecyybjw1xypcu7830g.png)
ई सी सदस्य
डॉक्टर स्मिता फाटक
२००८ पासून सेवासदन संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य आहेत
कामाचा अनुभव:
• एक शिक्षणतज्ञ म्हणून पुण्यातील अनेक नामवंत शाळा व महाविद्यालयांशी त्या संलग्न आहेत. सेवासदन संस्थेच्या अध्यापिका विद्यालय, राठी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, प्रौढ प्रशाला व इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शालेय समिती अध्यक्ष म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत.
• शिक्षण क्षेत्रातील नामवंत अशा Tilak College of Education च्या प्राचार्य पदावर त्यांनी काम केले आहे व तेथून त्या २०१९ साली निवृत्त झाल्या.
• सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व UGC च्या माध्यमातून Environment Education, Special Education, Teacher Training and Inclusive Education या विषयातील संशोधानात त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली १२ जणांना विद्यावाचस्पती ( PhD ) ही पदवी मिळाली आहे व ६ जणांना MPhil ही पदवी मिळाली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची गुणवत्ता चांगली असणे महत्वाचे आहे असे डॉक्टर स्मिता फाटक यांना वाटते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढीला लागतो व ते समाजात एक उत्तम नागरिक म्हणून काम करू शकतात असे त्यांना वाटते.
![AjitDamle AjitDamle](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/AjitDamle-py7xc8srbdrlmmh8fvcs5sdrqis2i1eon463g4rzgg.jpg)
ई सी सदस्य
अजित अनंत दामले
कामाचा अनुभव:
• चार्टर्ड अकौंटंट.
• दामले आणि यादवाड चार्टर्ड अकाउंटंट या फर्म मध्ये १९८२ पासून पार्टनर म्हणून कार्यरत.
• सेवासदन संस्थेचा कोशाध्यक्ष म्हणून २०१८ पासून कार्यरत.
![inamati inamati](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/inamati-py63bktkwuafx4pvi1l15157kb2b157i7plmsaom68.png)
ई सी सदस्य
श्रीनिवास इनामती, वकील
शिक्षण:
बी.ए. एल.एल.एम
डायरेक्टर
डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंटस
कामाचा अनुभव:
• सध्या डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंट्सचे डायरेक्टर आहेत.एल. एल.एम ची पदवी घेतली असून सुमारे ४० वर्ष कामगार कायद्यामध्ये प्रॅक्टीस करत आहेत. त्यांच्यारास्त,न्याय्य आणि दृढ दृष्टिकोनांमुळे मालक व कर्मचारी या दोन्ही पक्षांकडून वेतन करार अटींमध्ये नियोक्ता म्हणून स्वीकारले जाते.
• गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड (कोल्हापूर)या फौन्द्री उद्योगातील नामांकित कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरआहेत
• अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, सर्विस इंडस्ट्रीज,बँक, हॉस्पिटल्स, सारख्या संस्था यांचे कामगार न्यायालये, औद्योगिक न्यायालयातप्रतींनिधी म्हणून काम पाहिले. आता त्यांच्या सहकार्यांना मार्गदर्शन करतात.
• तसेच कॉर्पोरेट क्लाईंटलातेकामगार कायदे,करार, सेवाशर्ती व वेतनकरार यासाठी सल्ला व मार्गदर्शन करतात.
• तसेच एच आर संबंधित, कायदेशीर व संलग्न बाबींवर एम सी सी आय ए, सी आय आयचे ही अनेक वर्ष सल्लागारआहेत.
• आयआर आणि कामगार कायद्यांवरील विविध कार्यशाळा आणि सेमिनारमध्ये संबोधित केले आहे.
विविध NGOस्वयंसेवी संस्था आणि सामाजिक सेवा संस्थेशी संबंधितआहेत
१.अध्यक्ष एचआर आणि आयआर समिती एम. सी.सी. आय. ए 2020-2022
२. सदस्य मॅनेजमेंट कमिटी सुहरूद मंडळ, पुणे
३.पूर्व अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट
४.सदस्य व्यवस्थापन समिती, सेवासदन, पुणे
५.माजी विश्वस्त व सदस्य गव्हर्निंग कौन्सिल पूना विभागीय उत्पादकता परिषद.
६.पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ
७. पुणे माथाडी व इतर मॅन्युअल कामगार मंडळाचे सल्लागार
८. पिंपरी चिंचवड माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाचे सल्लागार.
![cmit cmit](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/cmit-pxuefhau567krbzi3ysf23zq2ztptbfhzsfys6ulvk.png)
ई सी सदस्य
श्री सौरभ धानोरकर
फिनोलेक्स इंडस्ट्रीज या नामांकित कंपनी मधून मँनेजिंग डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले.
शिक्षण:
मुंबई येथील Sydenham College मधून पदवी घेतल्यानंतर श्री धानोरकर यांनी चार्टर्ड अकौंटंट ही पदवी मिळवली.
कामाचा अनुभव:
एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काही काळ काम केल्यावर १९८३ साली श्री धानोरकर फिनोलेक्स कंपनी मध्ये वित्त विभागात रीजू झाले. वित्त विभागाचे प्रमुख म्हणून ५ वर्षे काम केल्यावर विपणन विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १९९६ साली त्यांची कंपनीच्या संचालक पदावर नेमणूक करण्यात आली.
त्यानंतर कंपनीच्या Chief Operating Officer ( COO ) पदावर त्यांनी बरीच वर्षे काम केले व त्यांची Assistant Managing Director ( AMD ) म्हणून सुद्धा नेमणूक करण्यात आली. २०१२ साली श्री धानोरकरांची Managing Director पदावर नियुक्ती करण्यात आली.
PVC पाईप बनविणा-या एका लहान कंपनीचे एका मोठ्या उद्योग समुहात झालेले स्थित्यंतर श्री धानोरकर यांनी पाहिले आहे. फिनोलेक्स कंपनीशी श्री धानोरकर गेली ३० वर्षे निगडीत आहेत व या कालावधीत कंपनीची उलाढाल २ कोटी पासून २५०० कोटी पर्यंत वाढली आहे. २०१६ च्या अखेरीस श्री धानोरकर यांनी कंपनीच्या कामकाजातून निवृत्ती स्वीकारली आणि आता आपल्या कुटुंबियांच्या समवेत काळ व्यतीत करतात व अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत. फिनोलेक्स कंपनीला ते वेळोवेळी सल्लागार म्हणून अजूनही योगदान देतात. त्यांनी देह विदेशात अनेक ठिकाणी प्रवास केला आहे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात आपले विचार मांडले आहेत.
अनेक संस्थांचे कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून ते सध्या काम पाहतात.
![apte apte](https://sevasadanpune.org/wp-content/uploads/elementor/thumbs/apte-py6ca6zelrxcr03nnhvaxmcnh8xkx9yx8id4j8c6kg.png)
ई सी सदस्य
सौ. भारती आपटे
शिक्षण:
BA Psychology (Hon.)
कामाचा अनुभव:
शालेय विद्यार्थ्यांना निबंध लेखनाचे मार्गदर्शन.
शालेय विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन व मार्गदर्शन.
अनेक संस्थांच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून कार्यरत.