Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

सेवासदन अध्यापिका विद्यालय

ऐतिहासिक वारसा असलेली सेवासदन संस्था इसवी सन 1909 साली श्रीमती रमाबाई रानडे व गोपाळ कृष्ण देवधर यांनी स्थापन केली. स्त्रीला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी, शिक्षण देणारी अविरत कार्यरत राहणारी सेवासदन ही एक मान्यवर संस्था आहे.  या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध खात्यांपैकी एक म्हणजे सेवासदन अध्यापिका विद्यालय होय.अखंड चालू आहे.

अध्यापिका विद्यालयाची स्थापना 1914 साली श्रीमती रमाबाई रानडे यांनी केली. सेवा सदन संस्थेने समाजात स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. सेवासदन अध्यापिका विद्यालय हे महाराष्ट्रातील एक नामवंत,  सुप्रसिद्ध, दर्जेदार अध्यापिका विद्यालय आहे. आज पर्यंत विद्यालयाने कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील दर्जा कायम उंच ठेवला आहे. त्यासाठी अध्यापिका विद्यालय सतत प्रयत्नशील असते. यासाठी विद्यालयात विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबविले जातात. व्यासंग, सेवावृत्ती, कर्तव्यदक्षता व आशावाद यांचे आदर्श विद्यालयात दिसून येतात.

समाजात यशस्वीपणे वावरणाऱ्या शिक्षकाला अनेक पैलू हवेत. वत्सलता, कठोरता, कळकळ, काटेकोरपणा,खिलाडूपणा, सचोटी, अभिरुची, कलाशक्ती, इत्यादी गुण आवश्यक आहेत. या सर्व पैलूंचा समावेश विद्यार्थिनींमध्ये होण्यासाठी अध्यापिका विद्यालयात प्रयत्न केले जातात. विविध अध्यापन कौशल्य विद्यार्थिनींमध्ये विकसित होण्यासाठी सूक्ष्मपाठ, सेतू पाठ, ज्ञान पाठ आयोजित केले जातात. तज्ञ व कुशल प्राध्यापक विद्यार्थिनी समोर पाठाची प्रात्यक्षिके सादर करतात.

एकविसाव्या शतकातील बदलत्या काळानुसार अध्यापिका विद्यालयाने ही कात टाकली आहे. सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, मानसशास्त्र प्रयोगशाळा, नागरी संरक्षण प्रशिक्षण,प्रथमोपचार प्रशिक्षण, एरोबिक्स, इंग्रजी विषय ज्ञान वर्ग, योगासने इत्यादी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम अध्यापिका विद्यालयात घेतले जातात. परिपाठ हा तर अध्यापिका विद्यालयाचा आत्माच आहे. दैनंदिन परिपाठात वाद्यांच्या गजरात राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, प्रार्थना, समूहगीत, बातमी वाचन, बोधकथा, वैयक्तिक गीत, काव्यवाचन, दिनविशेष, इत्यादीचा समावेश केला जातो. त्यामुळे विद्यार्थिनींचा मानसिक विकास होतो. त्यांच्या कौशल्यांमध्ये वृद्धी होते.

अध्यापिका विद्यालयाच्या विद्यार्थीनी जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने भरघोस यश मिळवत आल्या आहेत. विद्यार्थिनींनी अनेक सांघिक व वैयक्तिक स्पर्धांम शैक्षणिक प्राविण्‍यासाठी वर्गामध्ये तक्ते मॉडेल्स चित्रे एलसीडी प्रोजेक्टर द्वारे अध्यापन केले जाते. प्रत्येक विषयाच्या अंतर्गत विविध उपक्रम साजरे केले जातात. प्रत्येक विषयाचे शैक्षणिक साहित्य तयार करून घेतले जाते. विविध अभ्यास मंडळे, दर्जेदार प्रात्यक्षिके, सहली, शिबिरे, स्पर्धा, रॅली, उपक्रम, इत्यादी द्वारे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. अध्यापन, कला, क्रीडा या सर्व बाबतीत तज्ञ

प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची यशस्वी वाटचाल अखंड चालू आहे.ध्ये यश संपादन केले आहे.